जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा (पूर्व, पश्चिम व महानगर) ची संघटनात्मक महत्त्वाची बैठक आज दुपारी १२:३० वाजता भाजप कार्यालय, जी.एम. फाउंडेशन येथे संपन्न झाली. या बैठकीस प्रदेश प्रवक्ते व निवडणूक निरीक्षक प्रदीप पेशकार आणि आमदार राजूमामा भोळे प्रमुख उपस्थित होते.
बैठकी दरम्यान आमदार भोळे यांनी आगामी पक्षीय कार्यक्रमांची माहिती उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करून पक्षाची ताकद अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना निवडणूक निरीक्षक प्रदीप पेशकार यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती भव्य स्वरूपात साजरी करणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. “जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, आणि हे यश कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक शक्तीमुळेच शक्य झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत नूतन जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांचा सत्कार प्रदीप पेशकार यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच मावळत्या जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांचा गौरव करून त्यांचे योगदानही स्मरणात ठेवले गेले.
बैठकीस महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महिला आघाडी उपाध्यक्षा रेखा वर्मा, नंदू महाजन, सुरेश धनके, माजी आमदार महेंद्र पाटील, महिला अध्यक्षा भारतीताई सोनवणे, सरचिटणीस महेश जोशी, जितेंद्र मराठे, सचिन पानपाटील, लालचंद पाटील, मधुकरभाऊ काटे, विशाल त्रिपाठी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन नितीन इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल वाघ यांनी केले.