जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र बिबानगरच्या वतीने आज (दि.१६) केंद्राच्या इमारतीच्या छतावरील पाणी जमिनीत जिरवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले.
यावेळी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाचे पूजनही करण्यात आले. यावेळी केंद्रात महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. भाविकांनी श्रमदान करून शोष ड्डा तयार केला. त्यामध्ये विटा, रेती, खडी टाकून शोष खड्डयात छतावरील पाणी जिरवण्याची व्यवस्था करण्यात आली. येत्या काही दिवसात याभागात १०० झाडेसुद्धा लावण्याचा मानस महिलांनी यावेळी व्यक्त केला. ह्यावेळी, विजय साळुंखे, संगीता महाजन, जयश्री पाटील, साधना पाटील, मनीषा पाटील, अर्चना पाटील, श्री स्वामी समर्थ केंद्राचे पर्यावरण प्रतिनिधी वसंत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर प्रतिनिधी योगेश इंगळे, युवा प्रतिष्ठान प्रतिनिधी विलास कुमावत व बिबा नगर केंद्राचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वसंत पाटील यांनी मनोगतात सांगितले की, लवकरच इतरही केंद्रांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या पावसाळ्यात जास्तीतजास्त झाडे लावण्यात येणार असून महिला सेवेकऱ्यांनी योगदान दिल्यास प्रत्येक केंद्राचा परिसर हिरवागार झाल्याशिवाय राहणार नाही. या कामासाठी परमपूज्य गुरुमाऊली, आदरणीय श्री. चंद्रकांतदादा मोरे, आदरणीय श्री. आबासाहेब मोरे, यांचे आशीर्वाद आणि केंद्राचे प्रतिनिधी श्री. शिंपी व जिल्हा प्रतिनिधी विजय निकम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.