बळीराम पेठ घरफोडीतील दुसरा संशयित अटकेत

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठेत घरफोडी झाल्याचे १५ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आले होते. चोरी प्रकरणातील दुसऱ्या संशयित आरोपीला आज शहर पोलीसांनी सापळा रचून अटक केली आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, योगेश काशीनाथ पवार (वय-४४) रा. बळीराम पेठ यांचे तीन मजली इमारत आहे. १४ ऑगस्ट रोजी रात्री उशीरापर्यंत जेवण करून तिसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. त्यावेळी खालच्या घराचा दरवाजा बंद केला होता. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खालच्या घराचा दरवाज टॉमीने तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट फोडले.

कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या, दोन चांदीच्या मुर्त्या आणि ७ ते ८ हजार रूपयांची रोकड असा एकुण ४३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. दरम्यान, चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी संशयित चोर व हद्दपार असलेला आरोपी रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख (वय २२, रा.तांबापुरा) याला अटक करण्यात आली होती. अधिका चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी रिजवान याने चांदीच्या लक्ष्मीच्या मुर्त्या सोडून इतर सर्व मुद्देमाल पोलीसांना काढून दिला होता. या गुन्ह्यातील दुसरा साथिदार हा तेव्हापासून फरार होता.

यांनी केली कारवाई
दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अक्रम शेख आणि सुधिर साळवे यांना फरार असलेला संशयित आरोपी समिर हमीद काकर (वय-१९) रा. तांबापूरा हा तांबापूरा परिसरात आल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, रतन गिते, पोना सचिन वाघ यांनी कारवाई करत आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तांबापूरा येथून समिर काकर याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून चांदीची ब्रेसलेट व चांदीची लक्ष्मीची मुर्ती हस्तगत केला आहे.

संशयितावर यापुर्वीही गुन्हे दाखल
आज अटक केलेला आरोपी समीर काकर हा घरफोडी गुन्ह्यात रामानंद नगर, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. अल्वयीन दोन वर्षांपासून शहरातील अनेक घडफोडी केल्याची शक्यता आहे. उद्या संशयित आरोपी याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Protected Content