पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

यावल प्रतिनिधी । येथे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेनेचे उपनेते ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरातील हातावर पोट भरून आपले उदरनिर्वाह करणाऱ्या गरजु व गोरगरीब नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते धान्य व अन्नदानाचे वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. 

यावल ग्रामीण रुग्णालयात  फळवाटप व वृक्षरोपणाचा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शिवसेनेच्या यावल  नगर परिषदच्या नगरसेवकांनी तसेच शिवसेनेच्या  विविध स्थानिक स्वराज्य संस्थावरील कार्यरत असलेल्या संचालकांनी तथा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , शहर उपप्रमुख शरद कोळी , संतोष खर्चे , पप्पू जोशी , मोहसीन खान , अजहर खाटीक , कृउबाचे संचालक सुनिल बारी यांच्यासह सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.