झाली हो झाली….अनलॉकची घोषणा झाली ! : जाणून घ्या इत्यंभूत माहिती

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाने मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली आहे. https://livetrends.news यात पाच लेव्हलवरून अनलॉक होणार आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचा दर व ऑक्सीजन बेडवरील रूग्णसंख्या कमी असणार्‍या जिल्ह्यांसाठी जवळपास पूर्णपणे अनलॉक होणार असल्याचे यातून दिसून आले आहे. याबाबत जळगाव जिल्हा प्रशासन लवकरच स्वतंत्र नोटिफिकेशन काढणार आहे. तथापि, राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता जिल्ह्यात पूर्णपणे अनलॉक होणार असल्याचे स्पष्ट झाले असून यात नेमके काय सुरू राहणार ? याची माहिती आम्ही आपल्याला देत आहोत.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आधीच राज्यातील कमी पॉझिटीव्हीटी दर असणार्‍या १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक होणार असल्याची घोषणा केली होती. https://livetrends.news यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्मित झाले होते. या अनुषंगाने अखेर राज्य सरकारने नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार राज्यात पॉझिटीव्हीटीचा दर आणि ऑक्सीजन बेडवरील रूग्ण कमी असणार्‍या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात पूर्णपणे अनलॉक होणार असून याबाबत जिल्हाधिकारी लवकरच निर्देश देऊ शकतात. अद्याप तरी याबाबतचे नोटिफिकेशन निघाले नसल्याचे लक्षात घ्यावे….

दरम्यान, अनलॉकचे नोटिफिकेशन आल्यानंतर जिल्ह्यात खालीलप्रमाणे अनलॉक होऊ https://livetrends.news शकते.

१) वाहतूक : आधीप्रमाणे नियमित प्रवासी व वस्तूंची वाहतूक करता येईल.

२) अत्यावश्यक आणि अत्यावश्यकतेतर या दोन्ही प्रकारातील दुकाने : नियमित वेळेनुसार उघडी राहतील.

३) मॉल, थिएटर, नाट्यगृह : https://livetrends.news आधीप्रमाणे नियमित खुले राहतील.

४) हॉटेल व रेस्टॉरंट : नियमित वेळेनुसार खुले राहतील.

५) लोकल ट्रेन्स (सुविधा असल्यास) : स्थानिक रेल्वे प्रशासनाला अधिकार राहतील.

६) मैदाने, जॉगींग ट्रॅक, सार्वजनीक ठिकाणे, सायकलींग : पूर्ववत सुरू करण्यात येतील.

७) सर्व खासगी कार्यालये : पूर्ववत पूर्ण वेळ खुली राहतील.

८) शासकीय कार्यालये : पूर्ण क्षमतेने खुली राहतील

९) क्रीडा/शुटींग आदी : आधीप्रमाणे नियमित राहतील.

१०) सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनपर कार्यक्रम : आधीप्रमाणे नियमित राहतील.

११) विवाहादी समारंभ : आधीप्रमाणे परवानगी

१२) अंत्यंस्कार : आधीप्रमाणे परवानगी

१३) निवडणुका : सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेला परवानगी

१४) कृषी संबंधीत दुकाने व कामे : पूर्ववत परवानगी

१५) बांधकाम : कोणतेही निर्बंध नाहीत

१६) संचारबंदी : पूर्णपणे उठविणार

१७) जीम/सलून/ब्युटी पार्लर आदी : कोणनेही निर्बंध नाहीत…पूर्ववत सुरू राहतील.

१८) सार्वजनीक वाहतूक : पुर्णपणे सुरू https://livetrends.news

१९) माल वाहतूक : पुर्ववत सुरू

२०) आंतर जिल्हा प्रवास : खुला. मात्र जिथे संसर्ग जास्त तेथे जाण्यासाठी वा तेथून येण्यासाठी ई-पास आवश्यक

२१) उद्योग : पूर्ण क्षमतेचे पुर्ववत खुले राहणार

या नोटिफिकेशनमध्ये प्रत्येक जिल्हाधिकार्‍याने याबाबत स्वतंत्र निर्देश जारी करून ७ जूनपासून आपापल्या जिल्ह्यातील संसर्ग दर व ऑक्सीजन बेडवरील रूग्णसंख्येनुसार अनलॉक करण्याचे नमूद केले आहे. https://livetrends.news हे नोटिफिकेशन प्रधान सचिव सिताराम कुंटे यांनी रात्री उशीरा जारी केले आहे.

या नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार जळगाव जिल्ह्याचा संसर्ग दर हा ५ टक्क्यांच्या आत असल्यामुळे आपल्याकडे पूर्णपणे अनलॉक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्हा प्रशासन लवकरच याबबात स्थानिक पातळीवरील अनलॉकसाठी नवीन निर्देश देऊ शकते. यानंतरच जिल्ह्यात अनलॉक होईल. तर राज्य शासनाने नोटिफिकेशन जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

Protected Content