यावल येथे मराठा एकता फाउंडेशन व अतुल पाटील मित्रपरिवारातर्फे निराधार कुटुंबास मदत

यावल प्रतिनिधी । गेल्या चार महिन्यापुर्वी एका शेतात मोलमजुरी करणाऱ्या अर्धअंध पत्नी व तीन मुलांचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका आदीवासी जोडप्यास पुनश्च दुर्दैवाने एका घटनेत दोघ हातास अपंगत्त्व आले. तथापि, माणुसकीचे धर्म पाळत मराठा सेवा फाउंडेशन जळगाव आणी अतुल पाटील मित्र परिवाराच्या वतीने मदत करण्यात आली. 

या बाबतचे वृत्त असे की , हिरालाल बुदला बारेला वय३२ वर्ष मुळ राहणार शिरवेल हा दोघ पायांनी अपंग असलेला आदीवासी तरूण यावल शहरात आपल्या अपंगत्वावर मात देवुन जिद्दीने मागील पाच वर्षापासुन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतांना साधारण चार महिन्यापुर्वी एका शेतातील कुट्टीकटर मशिनीवर काम करीत असतांना त्या दोन पायांने आदीच अपंग असलेल्या व्याक्तीची दोघ हात कट्टर मशीनी गेल्याने त्याची दुदैवाने दोघ हात देखील कापली गेलीत. नियतीने घातलेल्या कठीन प्रसंगात त्यास शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या युवकांनी मदत करून त्याची वैद्यकीय शस्त्रक्रिया केली.

दरम्यान पत्नी एका डोळ्यांनी अंध आणी पती दोघ पायांनी व हातांनी अपंग असलेल्या हिरालाल बारेलांच्या  कुटुंबावर मोठे संकट कोसळले असता अशा वेळी शिवाजीनगर परिसरात राहणारे सामाजीक कार्यकर्ते नरेन्द्र शिंदे यांनी माजी नगराध्यक्ष तथा गटनेता अतुल पाटील यांच्या माध्यमातुन संपर्क साधुन पाठपुरावा करीत या अपंग आणी खऱ्या अर्थाने निराधार कुटुंबास कशा प्रकारे मदत करता येईल, यासाठी पाठपुरावा केला व आज मराठा एकता फाउंडेशन जळगाव व अतुल पाटील मित्रपरिवार यांचे वतीने व्हील चेअर सायकल अन्नधान्य वस्त्र आणी सातहजार रुपयांची रोख स्वरूपात या अपंग व निराधार कुटुंबास मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले.

भविष्यात या आदीवासी अपंग कुटुंबाच्या त्यांच्या एक वर्षाचा मुलगा, एक दोन वर्षाची आणी चार वर्षाची लहान मुलगी यांच्यासाठी ही योग्य मदत कशी करता येईल यासाठी सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन या वेळी माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांनी दिले. 

या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अत्यंत साद्या पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश येवले सर , नगरसेवक समिर शेख मोमिन , सामाजीक कार्यकर्ते धिरज महाजन , गणेश महाजन , हाजी फारूक शेख , एजाज देशमुख, राष्ट्रवादीचे हितेश गजरे यांच्यासह आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते , कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील यांनी मानले 

 

 

 

 

Protected Content