रिलायन्स इंडस्ट्रीज बनली भारतातली अव्वल तेल कंपनी

MukeshAmbani k9sG 621x414@LiveMint

नवी दिल्ली वृत्तसंस्था । मुकेश अंबानी या आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ने आज इतिहास रचला आहे. ९.५ लाख कोटी रुपयांची भागभांडवल असणारी पहिली भारतीय कंपनी होण्याचा मान मिळवला असून कंपनीने ब्रिटीश पेट्रोलियमला (बीपी) मागे टाकत जगातील सहा प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटीश पेट्रोलियमला मंगळवारी मागे टाकले. मुकेश अंबानी यांच्या तेल कंपनीचे एकूण बाजारमूल्य १३८ अब्ज डॉलर (९.६६ लाख कोटी रुपये) इतके झाले. तर ब्रिटीश पेट्रोलियमचे एकूण बाजारमूल्य १३२ अब्ज डॉलर (९.२४ लाख कोटी रुपये) आहे. यावर्षी रिलायन्सच्या समभागांमध्ये तीन पटीने वाढ झालेली आहे.

‘ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्स’नुसार समभागांमधील झालेल्या वाढीमुळे मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत वाढ होऊन ती ५६ अब्ज डॉलरवर (३.९२ लाख कोटी रुपये) पोहोचली. ‘अलीबाबा’चे जॅक मा यांना मागे टाकून अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस काही वेळासाठी रिलायन्सचा ‘एमकॅप’ पहिल्यांदा ब्रिटीश पेट्रोलियमच्या पल्याड गेला होता. त्यानंतर आज कंपनीच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली आणि पुन्हा एकदा रिलायन्सने आघाडी घेतली. मुकेश अंबानी यांनी कंपनीवरील कर्ज शून्यावर आणण्यासाठी रिलायन्सच्या तेल व रसायन व्यवसायातील २० टक्के भांडवल सौदी अरेबियातील सौदी अरामको या कंपनीस विकण्यात येण्याच्या घोषणेसह अनेक उपाययोजनांची घोषणा केली होती. पुढील १८ महिन्यांत कंपनीवरील सर्व कर्ज शून्यावर आणले जाईल, असे ते म्हणाले होते.

Protected Content