दाभोळकर हत्या : पुणाळेकर व भावे विरोधात सीबीआयकडून पुरवणी आरोप पत्र दाखल

dabholkar

 

पुणे (वृत्तसंस्था) सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांड प्रकरणी सीबीआयने बुधवारी कोर्टात पुरवणी आरोप पत्र दाखल केले आहेत. त्यात संजीव पुणाळेकर आणि विक्रम भावे या दोघांची प्रमुख आरोपी म्हणून नावे आहेत.

 

20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते दाभोळकर (67) मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्याचवेळी त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) आपले विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांच्या हस्ते आज आरोप पत्र दाखल केले आहे. त्यानुसार आरोपी संजीव पुणाळेकर आणि विक्रम भावे अशी या दोघां आरोपींची नावे आहेत. भावे सध्या येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. तर पेशाने वकील असलेला दुसरा आरोपी पुणाळेकर जामिनावर आहे. सीबीआयने आपले वकील प्रकाश सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरवणी आरोप पत्र कोर्टामध्ये सादर केले आहेत. तर सहाय्यक सत्र न्यायाधीश एस.आर. नवंडर यांच्या अध्यक्षतेखालील विशेष यूएपीए न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे.

Protected Content