हार्ट ऑफ गोल्ड : मृत कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या कुटुंबाला मदत करणारे तीन प्रेरणा योध्दे !

जळगाव । कोरोना म्हटल्यानंतर दूर पळणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आणि माणसुकीचा नवीन आदर्श जगासमोर मांडणारी एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. यात कोरोना बाधीत मृत महिलेच्या कुटुंबाच्या मदतीसाठी तीन तरूण सरसावले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हुपरी गावात कोरोनाने महिला मृत झाली होती,तिचा मुलगा कोल्हापूरला औषधे आणण्यासाठी गेला होता. सासूचा जीव गेलेला पाहून सून फिट येऊन पडली होती. तर ४ वर्षांच्या अपंग नातीने भुकेने हंबरडा फोडला होता. ही परिस्थिती पाहूनही आसपासचे कोणीच मदतीला येत नव्हते. जो तो मरणाच्या भीतीने तिकडे कानाडोळा करत होता.

चिमुकलीने भुकेसाठी फोडलेला हंबरडा पाहून अमेय जाधव, युवराज लोहार, वैभव माने या तिघांना गहिवरून आले, मृत महिला कोरोना पॉझिटीव्ह असतानाही हे तिघे जिवावर उदार होऊन कुटुंबाच्या मदतीला धावले. बिमारी से लढना है…बीमार से नही हा संदेश समाज मनावर त्यानी अधोरेखित केला. ह्या माणुसकीच्या आणि धाडसी कार्याबद्दल आपल्याला प्रेरणायोध्दे म्हणून रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्यावतीने गौरवण्यात येत आहे,आपल्या या विशेष कामगिरीला आमचा सॅल्युट!

जय हिंद…जय महाराष्ट्र

( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्‍या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )

अधिक माहितीसाठी

फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers

Protected Content