जिल्हास्तरीय ‘गो गर्ल्स गो मोहीम’ अंतर्गत धावण्याची स्पर्धा

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील जिल्हा क्रीडा कार्यालय , जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा क्रीडा संकुल येथे ” जिल्हास्तरीय गो गर्ल्स गो मोहीम अंतर्गत” मुलींसाठी १०० मीटर धावणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हास्तरीय गो गर्ल्स गो मोहीम अंतर्गत ६ ते १८ वयोगटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत ६ ते ९ वयोगट प्रिती धनराज पाटील टाकळी चाळीसगाव प्रथम, आसमा मोहमद तडवी केर्हाळे (रावेर) द्वितीय, भाग्यश्री संजय नहलकर सावखेडा (पारोळा) तृतीय आहे. तर १० ते १३ वयोगट हिमानी धनंजय महाजन (रावेर) प्रथम, निलम बिहारी मोरे नशिराबाद (जळगाव) द्वितीय, सुजाता विनोद माळोचे वरसाडे (पाचोरा) तृतीय. तसेच १४ ते १८ वयोगट क्रिशा विनोद बुला (भुसावळ ) प्रथम, भुवनेश्वरी प्रभुचंद्र पाटील वाघोड (रावेर) द्वितीय, जोत्स्ना ईश्वर सोनवणे तळेगाव (चाळीसगाव) तृतीयस्थानी आलेत. विजयी स्पर्धकांना जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उदयसिंग पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, डॉ. सिमरन जुनेजा, वेदांती बच्छाव,जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, कार्याध्यक्ष प्रा. ईकबाल मिर्झा यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात ले. याप्रसंगी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव प्रवीण पाटील, क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र चव्हाण, अरविंद खांडेकर व मीनल थोरात यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी सुजाता गुलहाने यांनी केले. पंच म्हणून जळगाव जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे प्रा. समीर घोडेस्वार, सचिन सूर्यवंशी, नरेंद्र महाजन, उल्हास ठाकरे, नितीन पाटील, विजय विसपुते, जितेंद्र शिंदे, देवानंद पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेत प्रत्येक गटातील प्रत्येक तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकाने विजयी झालेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

Protected Content