Home Cities एरंडोल प्रताप गंगावणे यांच्या ‘पद्मश्री’साठी मुख्यमंत्र्यानी शिफारीश करावी – संजय चौधरी

प्रताप गंगावणे यांच्या ‘पद्मश्री’साठी मुख्यमंत्र्यानी शिफारीश करावी – संजय चौधरी

0
143

 

एरंडोल, प्रतिनिधी । स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे लेखक तथा साहित्यिक प्रताप गंगावणे यांना पद्मश्री देण्याची शिफारस राज्य शासनाने भारत सरकारकडे करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येथील साई पद्मालय मोशन पिक्चरचे संचालक संजय चौधरी यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

प्रताप गंगावणे यांचे साहित्य व चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज असून त्यांना राष्ट्रीय व राज्य शासनाच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेद्वारे त्यांनी घराघरात देशभक्ती व देशाभिमानाचे भावना जागृत केलेली आहे. छत्रपती संभाजी राजांच्या खराखुरा इतिहास मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. संजय चौधरी यांनी केलेले ट्वीट मा. शरद पवार, ना. अजित पवार, ना. अमित देशमुख, ना. आदित्य ठाकरे व खासदार अमोल कोल्हे आदी मान्यवरांना टॅग  केलेले आहे.


Protected Content

Play sound