शेंदुर्णी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने प्रदर्शन

 

शेंदुर्णी, ता.जामनेर प्रतिनिधी । येथील डॉ. हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती प्राथमिक व श्रीकृष्ण माध्य व उच्च माध्य विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्षा डॉ.कौमुदी साने होत्या . तसेच संचालक डॉ कल्पक साने ,लिटिल चाम्स किडर गारटेनच्या प्राचार्या ऋचा साने , आदी मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. कौमुदी साने यांचा हस्ते थोर शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पुजन व विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इ.१ली ते ९वी पर्यंतच्या विद्यार्थ्यानी उपकरणासह सहभाग घेतला. त्यात सौर उर्जा , कृषी , आरोग्य , आपातकालीन व्यवस्थापन , प्रदूषण नियंत्रण , डिजीटल इंडिया , अन्नसुरक्षा , स्वच्छ भारत , गणितीय प्रतिकृती आदी विषयावर उपकरणांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, शिला पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक उपाशिक्षक अमोल देशमख तर सूत्रसंचालन प्रमोद सरोदे यांनी केले. आभार ज्योती सूर्यवंशी यांनी मानले .

Protected Content