सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार बंडू कापसे हे रात्री आठ वाजता शेतकर्यांच्या बांधावर पोहचले.
रविवार दिनांक ४ रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान सावदा परिसरात झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे शेतकर्यांचे केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासकीय सुट्टी असल्याने तहसीलदार बंडू कापसे हे जळगाव येथे परीक्षेसाठी उपस्थित होते. त्यामुळे दुपारी येऊ शकले नव्हते.
दरम्यान, सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी दूर ध्वनीद्वारे प्रांत अधिकारी कैलास कडलक व तहसीलदार बंडू कापसे यांना कळवली होती. त्यामुळेच कर्तव्यदक्ष तहसीलदार हे रात्री आठ वाजता शेतकर्यांच्या बांधावर उपस्थित राहून पाहणी केली. या पाहणी दरम्यान शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले झाले आहे त्यामुळे त्यांनी त्वरित उद्यापासून पंचनामे करावे असे आदेश मंडळ अधिकारी वानखेडे यांना दिले आहे.
यावेळी वेगवान वार्यांचा देखील शेतकर्यांनी कापसे यांच्याकडे केली. यावेळी सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्यासह कोचुर येथील शेतकरी कमलाकर पाटील, सावदा येथील शेतकरी संपत महाजन, अशोक धर्मा महाजन, अरुण विठ्ठल बडे, किरण चौधरी,निलेश चौधरी, यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.