मतदारसंघात संपर्क न ठेवण्याचा शिरीष चौधरींना बसणार फटका

shirish chaudhari

यावल प्रतिनिधी । माजी आमदार शिरीष चौधरी यांनी गत पाच वर्षात रावेर-यावल मतदारसंघात संपर्क न ठेवण्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता असून प्रचाराच्या निर्णायक टप्प्यात ही बाब स्पष्टपणे अधोरेखीत झाली आहे.

शिरीष चौधरी यांनी आधीच्या पंचवार्षिकमध्ये आमदार असतांना समाधानकारक कामे केली नव्हती. तसेच त्यांनी संपर्कदेखील ठेवला नव्हता. याचा फटका २०१४च्या निवडणुकीत बसून ते पराभूत झाले होते. दरम्यान, हा पराभव झाल्यानंतर तर त्यांनी पूर्णपणे संपर्क तोडून टाकला. अर्थात, जवळपास साडे चार वर्षे ”आऊट ऑफ कव्हरेज एरिया” राहिल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात ये-जा सुरू केली. यात्रेच्या माध्यमातून त्यांनी संपर्क सुरू केला. मात्र याला प्रतिसाद न लाभल्यामुळे ही यात्रा कशी तरी पार पडली. यानंतर अनेक दिवस ते नेमके कुणाकडून लढावे ? या विचारात अडकले होते. अखेर काँग्रेसचे तिकिट घेतल्यानंतर त्यांनी प्रचारास प्रारंभ केला. तथापि, गेल्या पाच वर्षात कधीही तोंड न दाखविणारे शिरीष चौधरी ऐन निवडणूक आल्यानंतर आता उगवले कसे ? हा प्रश्‍न जनता विचारत आहेत. यामुळे जनतेच्या नाराजीचा त्यांना या निवडणुकीत फटका बसू शकतो असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. दरम्यान, जनमताचा हा कौल लक्षात घेऊन शिरीष चौधरी यांच्या कंपूत अस्वस्थता पसरली असल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content