अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसचे जोरदार निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय सैन दलातील भरती प्रक्रियेत बदली करून केंद्र सरकाने अग्नीपथ योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या विरोधात जळगाव जिल्हा काँग्रेस कमीटीच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रीयेत बदल करून अग्निपथ योजना जाहीर केली आहे. या गोंधळलेल्या योजनेमुळे देशातील तरुणांचे भावितव्य धोक्यात आले आहे. केंद्र सनाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाले आहे. या अग्निपथ योजनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत आहे. जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पवार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अग्निपथ योजना आणि केंद्र सरकारच्या विरोधात सोमवार २७ जून रोजी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस प्रदीप सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहराध्यक्ष मुजीब पटेल, सुधीर पाटील, सरचिटणीस जगदीश गाढे, सरचिटणीस दिपक सोनवणे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमजद पठाणे, विशाल पवार, सखाराम मोरे, डॉ. जगदीश पाटील, रवि चौधरी, जितेंद्र चांगरे यांच्यासह आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/753674646082886

Protected Content