कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक पॉझिव्हिट रुग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८०८ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार २२४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

 

Protected Content