पोलीस हवलदारासह मित्राला मारहाण ! : एकास अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील राकेश हॉटेलात पोलीस हवलदारासह मित्राला काहीही कारण नसतांना तिन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सोमवारी ९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील एका संशयिताला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिर्झा मोहम्मद इसराल हिमायू बेग (वय-३८) रा. जामनेर, जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवलदार नोकरीवर आहेत. सोमवारी ९ जानेवारी मिर्झा बेग हे त्यांचे मित्र सलीम शेख रा. जामनेर यांच्यासोबत दुचाकीने जळगावला खासगी कामासाठी आले होते. काम आटोपून पुन्हा दुचाकीने मित्रासोबत जामनेला जाण्यासाठी निघाले. जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील रॉकेश हॉटेल येथे सायंकाळी ५.३० वाजता जेवण करण्यासाठी थांबले. त्यावेळी हॉटेलात तीन जणांनी त्यांचा मित्र सलीम शेख याला काहीही कारण नसतांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मिर्झा बेग हे गेले असता त्यांना देखील मारहाण केली. पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तिघांचे नावे निष्पन्न झाले. यात संशयित आरोपी आकाश विश्वे रा. सुप्रिम कॉलनी, सुनिल सुभाष साळवे रा. पाळासखेडा ता. सोयगाव जि.औरंगाबाद आणि सुनिल सोनार (पुर्ण नाव माहिती नाही) या तिघांविरोधात सोमवारी ९ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी सुनिल सुभाष साळवे याला मंगळवारी १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता अटक करण्यात आली आहे.

Protected Content