क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थी मार्कांपासून वंचीत : क्रीडामंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी

बुलढाणा-अमोल सराफ | राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परिक्षेत १५ अतिरिक्त गुण मिळतात. मात्र बुलढाण्यातील अनेक विद्यार्थी क्रीडा खात्याच्या भोंगळ कारभाराने यापासून वंचित राहिले असून याची क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दखल घेत त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी आता होत आहे.

 

याबाबतचे वृत्त असे की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत चांगले खेळाडू निर्माण व्हावे याकरता सरकारकडून अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्यक्रम केल्या जातात. पण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सेंट अँन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल मधील जवळपास २० ते २५ विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर देखील नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांना मुकले आहेत. त्यामुळे खेळाडू निर्माण होतील कसे त्यांना प्रोत्साहन मिळेल कसं हा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

 

ते  २३ ते २५ सप्टेंबर २०२२ दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन द्वारा आयोजित राज्यस्तरीय २४ वी जूनियर सब ज्युनिअर टेनिस हॉलीबॉल चॅम्पियनशिप २०२२ २३ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा सामारोपाच्या अध्यक्षस्थानी चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेता महल्ले होत्या. यामध्ये संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने खेळाडू सहभाग नोंदवला होता. त्यावेळेस चांगले खेळाडू निर्माण व्हावे खेळाडूंना शालांत परीक्षेत प्रोत्साहन म्हणून वाढीव गुण देण्याचे यावेळेस सांगण्यात आले होते .त्या प्रकारे शाळेने याचा अहवाल देखील संबंधित क्रीडा खात्याकडे योग्य वेळेत रीतसर चलन भरून दिला होता. तरीदेखील बुलडाणा जिल्हा क्रीडा खात्याचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत चांगल्या खेळाडूंना उमेदीच्या काळात निरुत्साह  व्हावा लागलं आहे.

 

जेव्हा त्यांच्या हातात दहावीची प्रमाणपत्रिका आल्यावर त्यामध्ये वाढीव गुण समाविष्ट झालेले दिसले नाही .त्यामुळे पुन्हा एकदा राज्य शासनाच्या चांगल्या कृतीचा चांगला उपक्रमाचा संबंधित विभागाकडून कसा बोजवारा  उडतो याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. त्यामुळे आता संबंधित क्रीडा विभागाने क्रीडा मंत्र्यांपासून यामध्ये तात्काळ दखल घेत या मुलांना त्यांच्या भविष्यात अंधारमय न होता त्यांचे गुण त्यांना देत उज्वल खेळाडू निर्माण होण्याकरता प्रोत्साहन द्यावं. अशी माफक अपेक्षा त्यांच्या पाल्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन हे स्वत: खेळाडू असून त्यांना खेळ आणि खेळाडूंबाबत आस्था आहे. त्यांनी याची दखल घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली आहे.

Protected Content