जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत बहुसंख्य कुटुंबे हे घरातील सुरक्षित वातावरणात असतांना बरेचचे दाम्पत्य हे अहोरात्र कोविडग्रस्तांच्या मदतीत कार्यरत आहेत. डॉ. विजय कुरकुरे आणि त्यांची पत्नी सौ. सविता कुरकुरे हे दाम्पत्यही अनेक अडचणींवर मात करून कोरोनाच्या प्रतिकारासाठी कार्यरत आहेत.
घरी १० महिन्याचं बाळ व एक मुलगी. बाळाला सांभाळते आया…. आणि सविता ताई व डॉ. विजय सेवा देतात कोविड रुग्णांना.
सौ. सविता कुरकुरे
परिचारिका, कोविड रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल
जळगाव
अभिमान आहे या दाम्पत्याचा..!
सौ. सविता व त्यांचे पती डॉ. विजय कुरकुरे आज दोन्ही कोविड रुग्णालयात आपली सेवा देत आहेत. घरी १० महिन्याचं बाळ व एक मुलगी. बाळाला सांभाळते आया… आणि सविता ताई व डॉ. विजय सेवा देतात कोविड रुग्णांना.
घरी आल्यावर बाळाला दुरून पाहणे किंवा त्याला हातात घेण्याआधी स्वतःला सॅनिटाईज करणे, गाडीला सॅनिटाईज करणे, कपडे धुण्यासाठी टाकणे सर्व वस्तू सॅनिटाईज करणे, अंघोळ करणे, नंतर बाळ घेणे व इतकं केल्यावरही जेव्हा बाळाला हातात घेतात तेव्हा त्यांचे हात थरारतात. अनेकदा वाटतं आपण बाळाचा जीव तर धोक्यात नाही ना घालत ?
कोविडच्या सुरवातीच्या मे महिन्यात मिळालेले एअर टाईट पीपीई किट घालून ४५ डिग्री मध्ये काम करणे खुपच जिकरीचे होते. संपूर्ण शरीर घामाने चिंब व्हायचे. नैसर्गिक विधी ही करता येत नव्हत्या. काम ही अविरत ८ तास किंवा जास्तच वार्ड सोडून जात येत नव्हतं. कधी दिवस पाळी तर कधी रात्र पाळी सांभाळायची. व रुग्णांची सेवा करायची ही सविता ताईंची कहाणी !
स्वतः वेदना सहन करून इतरांची, रुग्णांची अविरत सेवा करणार्या सर्व परिचरिकांना सलाम !
( अशाच प्रकारे कोरोनाच्या प्रतिकारासाठी झटणार्या कोरोना योध्द्यांना जळगावातील ख्यातनाम अशा रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सतर्फे हार्ट ऑफ गोल्ड या मालिकेच्या माध्यमातून वंदन केले जात आहे. ही मालिका आपण लाईव्ह ट्रेंडस न्यूजवरून देखील वाचू शकतात. )
अधिक माहितीसाठी
फेसबुक पेज : https://www.facebook.com/RCBafnaJewellers
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/rcb_jewellers