नवी दिल्ली-वृत्तसेवा | सेवेतुन बडतर्फ करण्यात आलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले हे आज सकाळपासून दिल्लीतील एका इमारतीच्या गच्चीवर पोहचले असून त्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
रणजीत कासले हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आले आहेत. विशेष करून त्यांनी सत्ताधारी नेते आणि पोलीस प्रशासनाबाबत केलेल्या गौप्यस्फोटांनी मोठी खळबळ उडाली आहे. याचमुळे त्यांना काही दिवसांपूर्वी सेवेतून बरखास्त करण्यात आले आहे. असे असले तरी देखील ते सातत्याने खळबळजनक दावे करत आहेत. यातच त्यांनी आज दिल्लीतील एका उंच इमारतीच्या छतावरून फेसबुक लाईव्ह करून आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अथवा आपण जीवाचे काही बरेवाईट करून घेऊ अशी धमकी दिली आहे.
रणजीत कासले यांनी गुप्ता या पोलीस अधिकाऱ्यामुळे आपण हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केले आहे. दिवसभरात आपल्या मागण्या मान्य करून न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तर त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून त्यावर लोक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.