मंगळग्रह मंदिरात मोफत मसाला ताक वाटप; भाविकांना दिलासा


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर परिसरात जैन जागृती सेंटर आणि जैन जागृती सेंटरच्या वतीने भाविकांसाठी मोफत मसाला ताकचे वाटप करण्यात आले. सध्याच्या उन व पावसाच्या छिळकाव्याने निर्माण झालेल्या उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या भाविकांना या उपक्रमामुळे काहीसा दिलासा मिळाला.

मंगळवारी श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची झालेली गर्दी लक्षात घेता, दोन्ही जैन जागृती सेंटरने संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. प्रवासात दमलेल्या आणि घामाघूम झालेल्या भाविकांना थंडगार मसाला ताक मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, मंगल सेवेकरी यांच्यासह जैन जागृती सेंटर अध्यक्ष डॉ. संजय शाह, सचिव विक्रम शाह, खजिनदार मनिष शाह, यश हळवदिया, पंकज दोडिवाला, मुकेश शाह, विपूल शाह, हितेश खन्ना, केहुल कोठारी, चेतन शाह आदी मान्यवर उपस्थित होते. जैन जागृती सेंटरचा हा स्तुत्य उपक्रम गेल्या महिन्याभरापासून सुरू असून, शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोफत मसाला ताक वाटप केले जात आहे. संस्थेने १ लाख रुपये किमतीचे मसाला ताक वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे अध्यक्ष डॉ. संजय शाह यांनी सांगितले.