राहूल गांधी रायबरेलीतून लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या दोन परंपरागत मतदारसंघातून पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातून क्रमश: राहूल गांधी आणि किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायबरेली आणि अमेठी हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ आहे. अमेठी मतदारसंघातून फिरोज गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. पण मागील २०१९ च्या निवडणूकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहूल गांधी यांचा पराभव केला होता.

मागच्यावेळी राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड आणि अमेठीमधून निवडणूक लढवली होती. त्यात ते अमेठी मधून पराभूत झाले होते. आता सुद्धा ते दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या २०२४ च्या निवडणूकीत राहूल गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. रायबरेलीच्या मागील खासदार सोनिया गांधी होत्या. त्या राज्यसभेच्या खासदार झाल्याने ही जागा रिक्त होती. आता राहूल गांधी या मतदारसंघातून आपले नशीब आजमवणार आहे. रायबरेलीमधून सोनिया गांधी यांनी २००४ पासून २०१९ पर्यंत सातत्याने खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. अमेठी या गांधी घराण्याच्या पारंपारिक मतदारसंघात किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायबरेलीमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.

Protected Content