मतदार यादीत तुमचे नाव आहे का? इथे चेक करा

मुंबई (प्रतिनिधी)  लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. 11 एप्रिलपासून देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 23 मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे आताच तपासून घेणे गरजेचे आहे. कारण ऐनवेळी मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे आताच पाहा. या कामात आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

 

तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही? हे बघण्यासाठी http://103.23.150.139/marathi/ ही साईट शासनाने तयार केली आहे. या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला Name Wise आणि ID Card Wise असे दोन पर्याय दिसतील. तुम्ही Name Wise या पर्यायावर क्लिक करुन District पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला जिल्ह्याचे नाव, तुमचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव आणि दिलेल्या संख्येची बेरीज असे पाच कॉलम भरावे लागतील. त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व माहिती इंग्रजीत भरावयाची आहे. त्यामुळे स्पेलिंग चुकता कामा नये. स्पेलिंग चुकल्यास अर्थात तुमचे नाव शोधताना अडचण येईल. तुम्ही Name Wise या पर्यायावर क्लिक करुन Assembly पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला जिल्ह्याचे नाव, मतदारसंघाचे नाव, तुमचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव आणि दिलेल्या संख्येची बेरीज असे पाच कॉलम भरावे लागतील. त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल.

 

तुम्ही ID Card Wise या पर्यायावर क्लिक करुनही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, ते तपासू शकता. त्यासाठी ID Card Wise केल्यानंतर जिल्हा निवडावा लागेल, त्यानंतर मतदान ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल आणि दिलेल्या संख्येची बेरीज टाकावी लागेल, त्यानंतर Search पर्यायवर क्लिक केल्यावर तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, ते दिसेल. दरम्यान, तुमच्या भागातला ऑफिसर कोण आहे हे देखील ही माहिती तुम्हाला व्होटर नॅशनल पोर्टलवर मिळू शकते. व्होटर आयडी 2 महिन्यांच्या आत मिळते.

Add Comment

Protected Content