Home Cities चाळीसगाव झारखंडातील घटनेचा चाळीसगावात निषेध

झारखंडातील घटनेचा चाळीसगावात निषेध

0
40
muslim samaj nivedan


muslim samaj nivedan

चाळीसगाव प्रतिनिधी । झारखंडमधील तबरेज अन्सारी या युवकाच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज येथील मुस्लीम समाजातर्फे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव मुस्लीम समाजाच्यावतीने आम्ही तबरेज अन्सारी हत्याकांडाचा जाहीर निषेध करीत असून त्याच्या हत्येस दोषी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच गोहत्येच्या नावाखाली व मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या नावाचा वापर करुन जय श्रीराम चा नारा देवुन मुस्लीमांना किती दिवस जिवे मारणार त्यांचा छळ केला जाणार? असा सवाल यात करण्यात आला आहे. यात पुढे म्हटले आहे की, हे असे लोक दहशतवादीच आहेत. सरकारने मुस्लिम संरक्षणार्थ कडक कायदा करावा व तबरेज अन्सारी यांच्या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व त्याच्या कुटुंबियांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound