Home Cities जळगाव …आणी गितांजली एक्सप्रेसमधील दुर्घटना टळली ( व्हिडीओ )

…आणी गितांजली एक्सप्रेसमधील दुर्घटना टळली ( व्हिडीओ )

0
38

जळगाव प्रतिनिधी । गितांजली एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याची घटना म्हसावद व शिरसोली स्थानकांच्या दरम्यान घडली. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने कोणतीही हानी झाली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती शिवाजी टर्मिनसहून हावड्याकडे जाणार्‍या (१२८५९ डाऊन) गितांजली एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला आग लागल्याचे म्हसावद व शिरसोलीच्या दरम्यान प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने हा प्रकार गार्डच्या लक्षात आला. यानंतर गाडी तातडीने थांवण्यात येऊन आग विझवण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. काही वेळाने आग आटोक्यात आली. मात्र डब्याच्या आतील भागात आग अजूनही धुमसत असल्यामुळे शेवटचा डबा सोडून गितांजली एक्सप्रेस जळगावकडे रवाना झाली. नंतर या डब्यातील आग विझवण्यात आली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी आग पूर्णपणे विझवण्यात येऊन हे डबे हटविण्यात आले.

पहा : गितांजली एक्सप्रेसला लागलेल्या आगीबाबतचा हा वृत्तांत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound