जळगाव प्रतिनिधी । गितांजली एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याची घटना शिरसोलीजवळ उघडकीस आली. मात्र यात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती शिवाजी टर्मिनसहून हावड्याकडे जाणार्या (१२८५९ डाऊन) गितांजली एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला आग लागल्याचे शिरसोलीजवळ प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने हा प्रकार गार्डच्या लक्षात आला.
दरम्यान, ड्रायव्हरने तातडीने गाडी थांबवली. यामुळे आजूबाजूच्या डब्यातील भयभीत प्रवासी लागलीच डबा सोडून खाली उतरले. शेवटच्या डब्यातून मोठ्या प्रमाणात धुर बाहेर येत असल्यामुळे प्रवासी घाबरले होते. तर परिसरातील ग्रामस्थांनीही रेल्वे रूळांकडे धाव घेतली. काही वेळाने आग आटोक्यात आल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.