Home Uncategorized डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये विद्यार्थिनींच्या स्वनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये विद्यार्थिनींच्या स्वनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन

0
105

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला वाव देणारे स्वनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १२ व १३ मार्च रोजी होणार आहे.

या प्रदर्शनात विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, परिधान, दागिने तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. यामध्ये बांधणी साड्या, दुपट्टे, पर्स, बॅग, स्केचिंग केलेल्या बॅग, विविध प्रकारचे वनपीस ड्रेस, घागरे, पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, मेहंदी डिझाईन, नेल आर्ट, सौंदर्यप्रसाधने तसेच मायक्रो आर्टच्या वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले आहे. याशिवाय आरीवर्क ब्लाऊज, एम्ब्रॉयडरी केलेले रुमाल, आकर्षक ग्रीटिंग्स, फोटो फ्रेम, रंगोली साहित्य, विविध प्रकारची ज्वेलरी व हाताने तयार केलेल्या ज्वेलरी किट यांचाही समावेश आहे.

या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील तसेच डॉ. प्रशांत वारके उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. कविता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मीनल राणे, कविता भोरटक्के, जयश्री कुलकर्णी, हिमानी जमाले तसेच शुभांगी पाटील यांनी विशेष परिश्रम घेत आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळत असून त्यांना उद्योजकतेची प्रेरणा मिळत आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थिनींच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound