राज्यपाल नियुक्त आमदारांची नवीन यादी जाणार ! : शिंदे यांचे पत्र

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे सरकारने राज्यपालांकडे पाठविलेली १२ आमदारांची यादी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी ही मुख्यमंत्री राज्यपालांना पाठवत असतात. यावर राज्यपाल निर्णय घेऊन त्या आमदारांची नियुक्ती होत असते. आजवर असेच होत होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १२ मान्यवरांच्या नावांची यादी पाठविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावर निर्णय घेतला नाही. यातील काही नावे ही नियमात बसत नसल्याचे कारण त्यांनी दिले होते.

दरम्यान, सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार नवीन १२ मान्यवरांची यादी पाठविणार असल्याच्या हालचाली काही दिवसांपासूनच सुरू झाल्या आहेत. यात भारतीय जनता पक्षाला आठ तर शिंदे गटाला चार आमदार मिळणार असल्याची चर्चादेखील सुरू होती. आता या अनुषंगाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून आधीच्या सरकारची यादी रद्द करण्याची अधिकृत मागणी केली आहे. यामुळे येत्या काही दिवसात शिंदे सरकारची नवीन यादी राज्यपालांकडे जाऊन ती मंजूर होईल असे मानले जात आहे.

Protected Content