‘आरे वाचवा’ मोहिमेतील आंदोलनकर्त्यांना जामीन

71465575

मुंबई (वृत्तसंस्था) आरे मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमी आणि ‘आरे वाचवा’ मोहिमेतील आंदोलनकर्त्या २९ जणांना कोर्टाने आज जामीन मंजूर केला आहे.

 

पर्यावरण प्रेमी आणि आरे वाचवा मोहिमेसाठी आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. या सर्वांना बोरिवलीच्या कोर्टात हजर केले असता २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मुंबईतील आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल पर्यावरणवाद्यांच्या विरोधात जाताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन झाडे कापण्याचा प्रकार समोर आला. पर्यावरण प्रेमी आणि ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या आंदोलकांना याची माहिती मिळताच त्यांनी रात्रीपासून या ठिकाणी धाव घेत आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आज आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना अटक केली. या सर्वांना कोर्टात हजर केले असता यातील २९ जणांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

Protected Content