तामसवाडीच्या ओंकारेश्‍वर मंदिरात श्रीफळ वाढवून ना.जावळे दसऱ्याला करणार प्रचाराचा शुभारंभ

na. haribhau javale

रावेर प्रतिनिधी । रावेर विधानसभेचे भाजपा-सेना व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे हे मंगळवार (दि. 8) रोजी तालुक्यातील तामसवाडी येथील ओंकारेश्‍वर मंदिरावर श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. याप्रसंगी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे.

यांची राहणार उपस्थिती
दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी अशोक कांडेलकर, राजेंद्र फडके, संजीव पाटील, संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, किशोर काळकर, नंदू महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, प्रल्हाद महाजन, योगराज पाटील, रवींद्र सोनवणे, आनंद बाविस्कर, रवींद्र पवार, तुषार पाटील, अरुण गद्रे आदी उपस्थित राहणार आहे. तरी यावेळी तालुक्यातील सेना-भाजपा युतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील विविध पालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक उपस्थित राहण्याचे आयोजन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Protected Content