आंदोलन सूचना मिळूनही सुरक्षा यंत्रणा गाफील

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – एसटी संपकरी आंदोलकांकडून महत्वाच्या ठिकाणी हल्ला होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी सूचना गुप्तचर विभागाकडून मिळूनही पोलीस सुरक्षा यंत्रणा गाफील राहील्या,  या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून चौकशीचा फार्स कशाला करता ? असा प्रश्न भाजपने उपस्थित करीत गृहमंत्र्यावर निशाणा साधला आहे.

गेल्या पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलनीकरणाच्या मुद्द्यावरुन १० नोव्हेंबर पासून ते २४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन सुरु होते.  याचा निकाल ४ किंवा ५ एप्रिल रोजी लागण्याची शक्यता होती. त्यानुसार  न्यायालयाच्या निकालानंतर काही वेळ जल्लोष झाला.

परंतु त्यांनतर सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी आंदोलकांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. या घटनेमुळे एकच खबळबळ उडाली होती. शिवाय राजकीय वर्तुळात देखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. यांनंतर, न्यायालयाकडून सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. मात्र आता या प्रकरणावरुन भाजपाने राज्याच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधला.

पोलीस गुन्हे शाखेकडून सुरक्षा व्यवस्थे संदर्भात आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत असून उच्च न्यायालयाची सुनावणीची तारीख पाच एप्रिलची देण्यात आली आहे.  सध्या आझाद मैदानात महिला आणि पुरुष आंदोलन कर्त्याची संख्या वाढत असल्याचेही नमूद केले होते.  एसटी कर्मचारी किंवा आंदोलकानी मंत्रालय सिल्वर ओक, मातोश्री बंगला आदि ठिकाणी आंदोलनाचा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यतेची सूचना गुन्हे अन्वेषण विभागाचे उपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस सह आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

मात्र ज्या विश्वास नांगरे-पाटील यांना घटनेपूर्वी माहिती मिळूनही ते महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्याना सुरक्षा पुरवू शकले नाहीत, तरीदेखील नांगरे-पाटील यानाच चौकशी प्रमुख कसे नेमता, ‘ असा टोला भाजपाने लगावला आहे

Protected Content