ममुराबाद सरपंचपदी भाग्यश्री मोरे यांची बिनविरोध निवड

Sivsena news

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ममुराबाद येथे झालेल्या पोटनिवडणुकीत सरपंचपदी तरुण व उच्चशिक्षित भाग्यश्री मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचा सत्कार शिवसेनेचे उपनेते आमदार गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. उच्चशिक्षित व तरूण सरपंच गावाला लाभल्याचे समाधान नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे.

तालुक्यात ममुराबाद हे गाव राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव असून अनेक राजकीय घडामोडी मुळे या गावाला तालुक्याचे राजकीय केंद्रबिंदू म्हणून ममुराबाद हे गाव समजले जाते. काही दिवसांपूर्वी तत्कालीन सरपंच अपात्र झाल्यामुळे येथे सरपंच पदाची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.दिनांक 16 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती व 25 नोव्हेंबर पर्यंत माघार घेण्याची मुदत होती यात भाग्यश्री मोरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली आहे.भाग्यश्री मोरे या 23 वर्षीय तरुणी असून उच्चशिक्षित आहे.त्यांनी एम.बी.ए .पूर्ण केलेले आहे. सामाजिक कार्यात व गावाच्या विकासासाठी त्यांची पहिल्यापासूनच आवड होती.

शिवसेनेचे उपनेते तथा माजी सहकार राज्यमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी भाग्यश्री मोरे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही आणि उच्चशिक्षित तरुण सरपंच लाभल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सत्कार प्रसंगी सांगितले.यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील,रावसाहेब पाटील , माजी सरपंच भरत शिंदे,गोपाळ मोरे, सईद मुल्लाजी, माजी सरपंच महेश चौधरी,विलास सोनवणे, हेमंत चौधरी यांच्यासह आजी- माजी ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content