रावेरात जेष्ठ नागरिकांची आरोग्य विषयक कार्यशाळेस प्रतिसाद

Raver news 5

रावेर प्रतिनिधी । येथील शेनाबाई गोंडू पंडित मराठा मंगल कार्यालयात श्री ओंकारेश्वर जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे जेष्ठ नागरिकांची आरोग्य विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. नितीन बारी उपस्थित होते. फेस्कॉमचे माजी राज्य अध्यक्ष व विद्यापीठाच्या निरंतर विभागाचे संचालक डी. टी. चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, नगराध्यक्ष दारा मोहमद, फेस्कॉमचे राज्य उपाध्यक्ष ना.ना. इंगळे, खानदेश अध्यक्ष सोमनाथ बागड, विनायक पांडे, सचिव बी. एन. पाटील, जि.प.चे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, श्री ओंकारेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. एस. आर. पाटील, पंचायत समिती सभापती जितु पाटील, सदस्य दीपक पाटील, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, यांच्यसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी डॉ. निलेश महाजन, डॉ. शांताराम पाटील, योगाचार्य प्रज्ञा पाटील, डॉ. सुरेश महाजन, सो. संदीप पाटील, डॉ. चंद्रदीप पाटील, डॉ. अमिता महाजन, यांनी विविध आजार व त्यावरील उपचारांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. यावेळी माऊली हॉस्पिटलचे डॉ. संदीप पाटील व डॉ. योगिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत जेष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.. यावेळी यादवराव पाटील, कडू पाटील, एस बी महाजन, बी आर पाटील, शामराव चौधरी, रसूल तडवी, सुधाकर चौधरी, भागवत महाजन, वामनराव पाटील, एस. एल न्हावी. सुमनबाई पाटील, आशालता राणे, यांच्यसह तालुकाभारातून आलेले जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. एस आर पाटील यांनी तर सूत्रसंचालन आर. बी. महाजन यांनी केले. दयाराम मानकरे यांनी आभार मानले.

Protected Content