पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्या नूपुर शर्मा व नविन जिंदाल यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजातर्फे निवासी नायब तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी अपशब्द वापरले. यामुळे संपूर्ण जगातील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे नुपुर शर्मा यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन पाचोरा तहसिल कार्यालयाचे निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील व पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव पाटील यांना देण्यात आले आहे.
निवेदन देते प्रसंगी अजहर खान, माजी नगरसेवक बशीर बागवान, जय वाघ, रसुल शेख, रफिक बागवान, अय्युब बागवान, अजहर खान, मोतीवाले, शकुर बागवान, सत्तार पिंजारी, मुख्तार शाह, मुस्लिम बागवान, अनिस खान, रहीम बागवान, हारुन बागवान, वसीम बागवान, मोहसीन खान, सईद शेख शब्बीर शेख, मुफ्ती इसरार, मौलाना अल्ताफ, हाफिज़ जहुर खान, शाकीर बागवान, रऊफ शाह, मोहम्मद लखारी, निसार पिंजारी, शफीयोद्दीन पिंजारी, मतीन बागवान, आकीब शेख, आबीद खान, डॉ. झाकीर देशमुख, गफ्फार सैय्यद, आरीफ ठेकेदार, अकरम कुरैशी, जावेद कुरैशी, मुजाहीद खाटीक, रउफ टकारी, नाज़ीम हाजी, तारीक सैय्यद, डॉ. अकील शेख सह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.