अमळनेर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ३८ गावांतील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने आज मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांकडून राज्य क्रमांक ६, शिरपूर अमळनेर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आम आदमी पार्टी अमळनेरचे शेतकरी नेते शिवाजीराव पाटील.डॉ रुपेश संचेती ज्येष्ठ सल्लागार महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टी ,आम आदमी पार्टीचे अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष पाटील मारवड येथील दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी शासनाच्या वतीने नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी निवेदन स्वीकारून शासन दरबारी लवकरात लवकर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. 35, कोटी 40, लाख रुपये, शासकीय अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी. आम आदमी पार्टीचा संघर्ष यापुढे ही जर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर असाच संघर्ष पुढे सुरू राहील. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आम आदमी पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते मंत्रालयावर धडक मोर्चा नेऊन  आंदोलनाद्वारे जाब विचारण्यासाठी आम आदमी पार्टी च्या वतीने पुढील रणनीती लवकरात लवकर तयार करून आम आदमी पार्टीच्या. धोरणानुसार तसेच वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. असे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना व शेतकरी यांना आवाहन केले आहे. सर्व शेतकरी व कार्यकर्ते यांच्यासमक्ष रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी परिसरातील दिलीप पाटील मारवड, सतीश बडगुजर अमळनेर, राजेंद्र पाटील सात्री, मधुकर पाटील गोवर्धन, राजू महाराज शहापूर, अशोक पाटील भरवस सरपंच, गुलाबराव सिसोदे डांगरी, बाबा सुर्वे मारवड, झुंबर पाटील एकलहरे तसेच समस्त पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी रास्तारोको स्थळी सहभाग नोंदवला. मारवड पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक जयेश खलाने त्यांचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!