खटला मागे न घेतल्याने बलात्कार पीडीतेवर अॅसिड हल्ला

Rape2 678x381

 

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) न्यायालयात सुरू असलेला बलात्काराचा खटला मागे न घेतल्याने एका महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरनगरमध्ये घडली आहे. या अॅसिड हल्ल्यात महिला तीस टक्के भाजली आहे.

 

पीडितेवर मेरठमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री चौघांनी जबरदस्तीने महिलेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. न्यायालयात सुरू असलेला बलात्काराचा खटला मागे घ्यावा असे आरोपींचे म्हणणे होते. त्यांचे म्हणणे तिने न ऐकल्याने हा अॅसिड हल्ला करण्यात आल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे.

Protected Content