इमारतीवरून पडलेल्या बालिकेचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । घराच्या दुसर्‍या मजल्यावरून खाली पडून जखमी झालेल्या ४ वर्षीय बालिकेचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, शौर्या हर्षल जोशी (वय ४, रा. प्लॉट क्रमांक ३८ खंडेरावनगर) ही बालिका २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घराच्या दुसर्‍या मजल्यावर खेळत होती. खेळत असताना तोल जावून ती खाली पडली होती. या अपघातात तिच्या डोक्याला जबर मार बसला होता. पालकांनी बेशुद्धावस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Protected Content