बदलत्या शैक्षणिक धोरणांमुळे शिक्षकांसमोर आव्हान- प्रभात चौधरी

*सावदा- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | बदलत्या शैक्षणिक धोरणांमुळे शिक्षकांसमोर आव्हान असल्याचे प्रतिपादन सचिव प्रभात चौधरी यांनी केले आहे. ते खिरोदा येथे शिक्षक व्यक्तीमत्व शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित अध्यापक विद्यालयात शिक्षक व्यक्तीमत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटन संस्थेचे सचिव प्रभात चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, शिक्षक हा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी असला पाहिजे. शिक्षकाला शिकवण्या बरोबरच संशोधक ,श्रमसंस्कार , गायन, आरोग्य , सामाजिक, मानसिक या सर्व गोष्टींचा विकास झाला पाहिजे. व्यक्तीमत्व शिबिरात या सर्व बाबींचा समावेश झाला पाहीजे कारण शिक्षक सशक्त असेल तरच उद्याचे राष्ट्र सशक्त होईल हे त्रिवार सत्य, व्यक्तीमत्व दिसण्यात नसते तर आपले विचार, वागणूक , ज्ञान यावर अवलंबून असते. फक्त बाहेरील देखावा म्हणजे कपडे, गॉगल विविध प्रकारचा भौतिक देखावा या वर व्यक्तीमत्व अवलंबून नसते. यावेळी त्यांनी अनेक महात्म्यांची उदाहरणे दिलीत. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा तारणहार नाही तर तो समाजाचा सुध्दा तारणहार बनला पाहीजे. प्रास्तविक अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मा. बी.एस. तायडे यांनी केले. त्यांनी उपक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. आठ दिवसीय शिबिरात कोणकोणते उपक्रम पार पाडले जातील याची माहिती दिली. शिक्षक व्यक्तीमत्व शिबिरात संवाद कौशल्य वक्तृत्व, तज्ञ वक्त्यांचे भाषणे, सांस्कृतीक कार्यक्रम , श्रमसंस्कार , बौद्धीक कार्यक्रम, चिंतन, आरोग्य , वादविवाद, मनोरंजनात्मक खेळ हे सर्व शिबिराच्या काळात घेतले जाईल असे त्यांनी सांगितले. उपक्रमाचे नियोजन व कार्यवाही हेमांगी चौधरी यांनी केली. या प्रसंगी संस्थेचे सहसचिव मा. कुमारदादा चौधरी ,पंचायतराज समितीचे प्राचार्य मा .महाजन सर , सप्तपुट ललितकला महाविद्यालयाचे प्राचार्य मा. अतुल मालखेडे , डि.एड.कॉलज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व छात्रध्यापक उपस्थित होते.

Protected Content