सावदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत सावदा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिस स्टेशनला निषेधाचे निवेदन देण्यात आले.

 

यावेळी सावद्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे, पंकज येवले, कुशल जावळे, अजय भारंबे, हरी परदेशी राजेश कोल्हे, दीपक पाटील, नंदा लोखंडे, डी. के. पाटील, तेजस वंजारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहेत. त्यामुळे तमाम महाराष्ट्रवासीयांना च्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा तथा संस्कृतीला शोभणारे नाही, तसेच तमाम महाराष्ट्रवासीयांना परवडणारे, पटणारे नाही. असे बेताल वक्तव्य करताना आपण कुठल्या पदावर आहेत. आपल्या पदाची प्रतिमा काय याचेही त्यांना भान नाही. यापूर्वी महाशय यांचेकडून असे बेताल तथा बालिश वक्तव्य केले गेले आहेत. त्यामुळे कुणीतरी खुश व्हावं म्हणून हे असे वक्तव्य करीत असतात.हे नेमके महाराष्ट्राचे राज्यपाल आहे की भाज्यपाल अशी शंका निर्माण होते. या सर्व प्रकाराचा सावदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात येत आहे.

Protected Content