विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी- डॉ. हर्षाली गोसावी

*पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन डॉ. हर्षाली गोसावी यांनी केले. त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी दरम्यान बोलत होत्या.

जामनेर उपजिल्हा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षाली सुरेश गोसावी यांनी टाकरखेडा जि.प मराठी शाळेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले की, आरोग्य उत्तम राहण्यासाठी स्वच्छता राखली गेली पाहिजे. यावेळी त्यांनी हात कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. औषध निर्माता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य केंद्र जामनेर माधवी अमरसिंग राठोड यांनी कोरोनाच्या संदर्भात तसेच आरोग्याच्या बाबतीत, नखांची स्वच्छता, हाताची स्वच्छता याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.२०० विद्यार्थ्यांपैकी १७६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. किरकोळ आजारी असलेल्या विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्या. गंभीर स्वरूपाचा आजार असलेले एकही विद्यार्थी आढळून आला नाही.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील हे होते. दरम्यान डॉ. हर्षाली गोसावी व डॉ. माधवी राठोड यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सदर कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर, उपाध्यक्ष रुपाली आगळे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रकाश पाटील, विलास साळुंखे, विजय उघडे, पालक निवृत्ती आगळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत शेळके यांनी करून आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक देवाजी पाटील, जयंत शेळके, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, श्रीमती ज्योती उंबरकर, रामेश्वर आहेर यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content