ना. हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते विकास कामांचे उद्घाटन

javale

 

रावेर प्रतिनिधी । ना. हरीभाऊ जावळे यांनी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

याबाबत सुत्रांनी दिलेल्यामाहिती नुसार, सर्व समाजाचा पाठिंबा मिळत त्यांनी 2014 मध्ये शिरीष चौधरी यांचा पराभव करत येथील मतदारसंघात आपली पकड मजबूत केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीष महाजन यांनी त्यांना नुकतेच कृषी व संशोधन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला असून शेवटच्या टप्‍प्यात विकास कामांसाठी निधी देखील दिला आहे. त्याच विकास कामांचे उदघाटन ना.जावळे याच्या हस्ते करण्यात येत असून ते मतदारसंघात फिरत बहुसंख्या असलेला, लेवापाटील, मराठा, कोळी, बुध्दिष्ट, माळी, धनगरसह इतर लहान-लहान समाजातील प्रतिष्ठित लोक नामदार जावळे सोबत सद्या दिसत असल्याने त्यांच्या साठी आगामी येणारी विधासभा निवडणूक सॉफ्ट कॉर्नर दिसत आहे

ना.जावळे पुन्हा भाजपाकडून इच्छुक असून त्यांची उमेदवारी जवळ-जवळ निश्चित मांडली जात आहे. मुक्ताई नगरचे भाजपचे तिकीट बदल्यास जिल्ह्यात ना. महाजन नंतर सर्वाधिक सीनियर म्हणून ना. जावळे नावा-रुपाला येतील. याच पक्षनिष्ठामुळे भाजपा सरकार निवडणूकीला एक महिना बाकी असतांना त्यांच्यावर महेरबान झाले आहे. आणि याच मार्गने ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहचतील. त्यामुळे आगामी निवडणूकीत ना.जावळे पूर्ण ताकदीनिशी लढतील असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. या मतदारसंघावर लेवा पाटील समाजाचे निर्विवाद वर्चस्व राहीले आहे. भाजपाला देशात अच्छे दिन असून रावेर मधुन देखिल भाजपा कडून उमेदवारी मागण्यासाठी लांब-लचक रांग लागली आहे. इच्छुकांकडून कोणी आरएसएस तर कोणी गिरीष महाजन, कोणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पासून उमेदवारीची लाईन लावल्याचे इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते सांगत आहेत. मुक्ताईनगर मधुन नाथाभाऊ यांच्या कन्येचे तिकीट मिळाल्यास भाजपा रावेर मधुन जावळे यांचे तिकीट कापण्याची रिक्त घेणार नसल्याचे राजकीय जानकार सांगत असल्याचे वृत्त आहे.

Protected Content