घरकुलची पुढील सुनावणी ३१ ऑगस्ट रोजी

धुळे प्रतिनिधी । घरकूल गैरव्यवहार प्रकरणी आता पुढील सुनावणी ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.

जळगाव येथील गाजलेल्या घरकूल गैरव्यवहार खटल्याच्या निकालावर आज सुनावणी होणार होती. तथापि, आजदेखील हा निकाल लांबणीवर पडला असून आता यावर ३१ रोजी निर्णय होणार आहे. घरकूलच्या खटल्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासारख्या मातब्बरांचे राजकीय भवितव्य पणास लागले आहे.

Protected Content