कुंभारखेडा शिवारात अज्ञातांकडून केळीच्या पिकांचे नुकसान; पोलीसात गुन्हा दाखल

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कुंभारखेडा शिवारातील शेतात अज्ञातांनी ३० केळीची झाडे कापून नुकसान केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अनिल कडू पाटील (वय-५६) रा. कुंभारखेडा ता. रावेर यांचे कुंभारखेडा शिवारात ५ एकर शेती आहे. त्यांच्या शेतातच्या बाजूला  सुनिल एकनाथ पाटील रा. ठाणे यांच्या मालकीची असून अनिल पाटील हे गेल्या १२ वर्षांपासून निम्मे हिस्स्याने शेती करत आहे. सोमवारी ७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता अनिल पाटील हे शेतात गेले असता शेतात लावलेले केळी पिकातील शेतात काही अज्ञात व्यक्तीने केळीची ३० झाडे कापून नुकसान केले. विशेष म्हणजे एका कापलेल्या झाडाला नोटबुकच्या कागदावर, “गावतल्या लोका ले कामाले सांगता नाही बाहर गावाच्या लोकाले सांगता पावऱ्याले पैसे देता गावतल्या लोकांले नाही” असा मजकूराचे व पावऱ्यावर भारी भरता असे लिहिलेले आढळून आले. याप्रकरणी अनिल पाटील यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content