Home आरोग्य एरंडोल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

एरंडोल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
59


एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथील भाजपतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नानी 21 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघातील 193 देशांनी समर्थन देऊन 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला असे उद्गार यावेळी योगदिन प्रमुख अशोक चौधरी यांनी काढले.यानिमित्ताने योग शिबिराच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन एरंडोल विधानसभा क्षेत्रात करण्यात आले होते.

सकाळी 6 वाजता एरंडोल शहरातील योगगुरू पी.ओ. बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच योगदिन प्रमुख अशोक चौधरी यांचा उपस्थित व ऑनलाईन करण्यात आला. याप्रसंगी शिबिरात सुनील भैया पाटील माजी संगयो अध्यक्ष, सचिन पान पाटील जिल्हा सरचिटणीस,अमोल जाधव तालुका सरचिटणीस,प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष,सुनील चौधरी शहराध्यक्ष युवा मोर्चा तसेच एरंडोल शहरातील नागरिक सहभागी होते जे कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्यांनी ऑनलाइन योग दिन शिबिरात सहभाग नोंदविला.


Protected Content

Play sound