चैतन्य तांडा येथे जागतिक योगा दिवस साजरा

चाळीसगाव, प्रतिनिधी । जागतिक योगा दिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील चैतन्य तांडा येथे आठ विद्यार्थी व शिक्षक वृंदाच्या उपस्थितीत योगा दिवस येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. 

दरवर्षी २१ जून हा जागतिक योगा दिवस म्हणून जगभर पाळण्यात येतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून हा दिवस साजरा करण्यात आला. तालुक्यातील चैतन्य तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आठ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून आपला आनंद द्विगुणित केला. हा कार्यक्रम फक्त एका तासासाठी आयोजित करण्यात आला होता. तसेच अनेकांना अप्रत्यक्षपणे सहभाग नोंदवता यावा यासाठी अनेकांनी ऑनलाईन पद्धतीने आपली हजेरी लावली. याप्रसंगी योगाचार्य म्हणून कुमावत, मुख्याध्यापक अजित पाटील,  राजेंद्र पाटील, पुनम चौधरी, सुनील देवरे, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंद राठोड, माजी चेअरमन दिनकर राठोड, गणपत जाधव, अभी राठोड , किरण राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाने संपूर्ण जगा प्रमाणे विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार उराशी न बाळगता सातत्याने आपला अभ्यास हा सुरूच ठेवण्याचे आवाहन मुख्याध्यापक अजित पाटील यांनी केले आहेत.

 

Protected Content