मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढावे


उस्मानाबाद, वृत्तसंस्था । राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्ज काढावे असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. उस्मानाबादमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

राज्य सरकारला जी काही मदत करायची आहे, ती मदत करत असतो. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज काढावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भागाची पाहणी करून कर्ज घेऊन लोकांना या संकटातून बाहेर काढावे असे मत शरद पवार यांनी मांडले, केंद्र सरकारनेही राज्याला मदत करण्याची गरज आहे. काल मी पाहणी केली त्यानंतर केंद्राने मदत करावी असं म्हटलं होतं. पण, लगेच पाहणी करून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. पाहणी करावे लागते, पंचनामे करावे लागता सर्व माहिती रेकॉर्ड ठेवावी लागते. त्यानंतर मदतनिधीची घोषणा होत असते असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अनेक पिकं कुजली किंवा सडली आहे. दुष्काळाच्या काळात उसाची लागवड कमी झाली होती. पुढील वर्षी याची कारखाने लवकरच सुरू करावे लागणार आहे. उसाचे प्रचंड नुकसान झाले. ते नुकसान भरून काढता येणार नाही’, असंही पवार म्हणाले.

Protected Content