गोपाळपुऱ्यातून दुचाकी लंपास; शनीपेठ पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ हद्दीतील गोपाळपुऱ्यात भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी आलेल्या हातमजूराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मुकेश अर्जून पवार (वय-३१) रा. व्हलका ता. भिकनगाव जि. खरगोन मध्यप्रदेश ह.मु. गोपाळपुरा महादेव मंदीरासमोर हे स्टाईल बसविण्याचे काम करतात. जळगावात भाड्याच्या घरात राहतात. तीन महिन्यांपासून ते गोपाळपूरा भागात राहण्यासाठी आले होते. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९, सीडी ९७०४) क्रमांकाची दुचाकी आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता त्यांनी दुचाकी घरासमोर लावली होता. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी दुचाकी जागेवर दिसून आली नाही. म्हणून त्यांची दुचाकीचा शोध घेण्यास सुरूवात केली. तीन-चार दिवस दुचाकी मिळून न आल्याने रविवारी शनी पेठ पोलीसात मुकेश पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा रजिस्टर नंबर ७८/२०२० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. संदीप पाटील करीत आहे.

Protected Content