भुसावळात सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोज व थर्मामीटरचे वितरण (व्हिडिओ )

भुसावळ, प्रतिनिधी । ग्रामीण कुटा फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच भुसावळ शहरातील पोलीस कर्मचारी तसेच तहसील ऑफिस कर्मचारी व नगरपरिषद कार्यालय व सफाई कर्मचारी यांना मोफत सॅनिटायझर व मास्क तसेच हॅन्ड ग्लोज व थर्मामीटरचे वितरण करण्यात आले आहे.

आज भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या उपस्थितीत सॅनिटायझर व मास्क, हॅन्ड ग्लोज व थर्मामीटर वितरण करण्यात आले . याप्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे , तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार , वितरण कंपनीचे एरिया मॅनेजर अर्जुन नरवाडे तसेच भुसावळ शाखेचे शाखाधिकारी समाधान शिंदे व यावल शाखेचे शाखाधिकारी आकाश हातेकर, संतोष पवार व कंपनीचे कर्मचारी वैभव कुरुंदकर हे उपस्थित होते.

https://www.facebook.com/watch/?v=3370754999622200

Protected Content