धनादेशासंदर्भातील कायद्यातील बदलास फॅम संघटनेचा विरोध!

जळगाव, प्रतिनिधी । धनादेशासंदर्भातील कायद्यातील केंद्र सरकारने आर्थिक बदलाला फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम) या संघटनेने विरोध केला आहे. या बदलामुळे व्यापाऱ्यांच्या त्रासात आणखी भर पडेल. फौजदारी खटला दाखल करण्याची तरतुद काढल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होईल अशी भिती संघटनेने व्यक्त केली आहे. निगोशिअबल एन्स्टुमेंट अॅक्ट संबंधित कलम १३८ आणि कलम १३३ (१) यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे. त्यावर हरकती आणि सुचना मागविल्या आहे. या बदलास फॅमने विरोध केल्याची आणि काही सुचना केल्याची माहीती अशी संघटनेचे उपाध्यक्ष ललीत बरडीया यांनी कळविली आहे.

फसवणुकीचे प्रकार वाढतील – बरडीया
केंद्र सरकारने आर्थिक परिस्थिती सुधारणांसाठी काही उपाययोजना करण्याचे ठरविले असून, त्याअंतर्गत या कायद्यात बदल करण्याचे प्रस्तावित आहे. नमूद कायद्यातील कलम १३८ आणि १३३ (१) नुसार धनादेश न वटल्यास संबंधित व्यक्तिविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल करता येतो. यामुळे फसवणुकीचे प्रकार रोखले जात आहेत. परंतु ही तरतूदच काढली गेली तर फसवणुकीचे प्रकार मोठ्याप्रमाणात वाढतील अशी भिती देखील ललीत बरडीया यांनी व्यक्त केली आहे.

 

Protected Content