क्रांती दिनानिमित्त नगरपालिकेने व्यक्त केली सैनिकांच्या प्रती कृतज्ञता

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर नगर पालिकेतर्फे क्रांती दिनानिमित्त सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

जामनेर नगरपालिकेतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक यांचा जामनेर नगरपालिकेतर्फे सत्कार व सन्मान करण्यात आला.

यावेळी स्वातंत्र्यसैनिक एकनाथ माळी, माजी सैनिक योगेश माळी, सोपान पालवे, कृष्णा डकले यांच्यासह कार्यक्रमात उपस्थित सर्व स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात नगरपालिका उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, नगरपालिका गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक भगवान सोनवणे, उल्हास पाटील, नाजिम पार्टी रिजवान शेख, अनिस शेख नगरपालिका कर्मचारी दुर्गेश सोनवणे, सुरज पाटील यांच्यासह नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Protected Content